ऑनलाइन सर्वेक्षण: महिला परिवार कडे लक्ष पण स्वताकडे करतात दुर्लक्ष

0
17

स्वयंपाकघरापासून ते कंपनीचे बोर्डरूम ते अगदी स्वत:चा व्यवसाय अशा वेगवेगळ्या भूमिका आजच्या महिला समर्थपणे बजावत आहेत; परंतु व्यवसाय व वैयक्तिक जीवनाचा समतोल राखताना स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जवळपास ४० टक्के महिलांनी कुटुंबाला प्राधान्य देण्यास महत्त्व दिले असले तरी त्यातही भारतीय ७९ टक्के महिलांनी काेणत्याही चाचण्या न केल्याचे किंवा आजारी पडल्यानंतरच आरोग्य तपासणी केली असल्याचे आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

महिलांमधील आरोग्याविषयी जागृती व दृष्टिकोन याचे मूल्यमापन करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सतर्फे फेब्रुवारी महिन्यात १००९ महिलांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते.

पाहणीचा तपशील
>सहा महिन्यांत एक-दोन वेळा आजारी पडण्याचे प्रमाण : ४७ %
>सहा महिन्यांत ३ हून जास्त वेळा आजारी पडण्याचे प्रमाण : २४ %
>आजारी पडल्यानंतरच तपासणी करणा-या महिला : ६३ %
>कधीत तपासणी नाही : १६ %
>वेळेअभावी तपासणी नाही :३१%
>तपासण्या महाग व अनावश्यक वाटण्याचे प्रमाण : ३० %
>आजारांची कल्पना आहे : ६१ %
>अद्याप प्रतिबंधात्मक चाचणीच केलेली नाही : ५९ %

आरोग्य विमा जागरूकता
>आरोग्य विमाच नाही : ४८ %
>विमा कवच आहे की नाही याची कल्पना नसलेल्यांचे प्रमाण : १२ %
>विमा कवच नसलेल्यांमध्ये अाराेग्य विमा खरेदी करण्याचा कधीही विचार न केलेल्या : ५३%
>स्वतःच विमा खरेदी : २२ %
>पती/ वडिलांमार्फत आरोग्य विमा योजना घेणा-या महिला : ७९ %
>विमा कवच आहे, पण त्याचा तपशील माहिती नाही : ४८ %
>विम्याच्या दाव्याचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नाही : ४०%