महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्या

0
13

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याला त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी पुणे महानगरपालिकेने केली असून सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन पुणे येथील भिड्यांच्या वाड्यात १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. जात आणि लिंग या भेदाला फुले यांनी कडाडून विरोध केला. तसेच समाजातील अस्पृशता नष्ट करण्यासाठी देखील फुले दाम्पत्याने काम केले आहे, असे ठरावात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने फुले दाम्पत्याचा भारतरत्न देऊन सन्मान करावा, या मागणीचा ठराव पारीत केला आहे