अहमदनगरचा भूषण गांधी ‘गेट’ परीक्षेमध्ये देशात अव्वल!

0
5

पुणे- ‘ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग‘ (गेट) या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील भूषण प्रमोद गांधी याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या उच्च शिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. त्यात भूषण देशात पहिला आला. भूषणला आता मुंबईतील आयआयटी पवईमध्ये बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये एमटेक करायचे आहे.
भूषण हा मूळचा सोनगाव (ता. राहुरी, जि. नगर) येथील आहे. भूषणने प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएस्सी केले. त्यानंतर बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठातूनन बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएस्सी केले. त्याने गेल्या वर्षीही ‘गेट’ दिली होती. त्या वेळी तो परीक्षेत पात्र ठरला होता. मात्र, त्याची रँक 563 असल्याने त्याने या वर्षी पुन्हा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. यंदा गेटची परीक्षा जानेवारीत पार पडली होती. त्याचा गुरुवारी निकाल लागला त्यात भूषणला 956 स्कोअरसह ‘लाइफ सायन्सेस’च्या पेपरमध्ये भारतात पहिला आला.