मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणी

0
12

मुंबई, दि.20 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आमदार अनिल बोंडे यांची मुलगी मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणी केली.
मनाली बोंडे यांनी चित्रांची माहिती दिली. प्रदर्शनात मंडाला, निसर्ग आणि पंच महाभूतांवरील तत्वावर आधारित चित्रांचा समावेश आहे.यावेळी आमदार अनिल बोंडे, आमदार सुरेश गोरे उपस्थित होते.
मंडाला थीमवर आधारित अत्यंत सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. भारतातील आध्यात्मिक मान्यता, मानवी मनातील संवेदना व आकांक्षा या चित्रांद्वारे सुंदर पध्दतीने अभिव्यक्त झाल्या आहेत, असा अभिप्राय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा देताना डायरीमध्ये नोंद केला.यावेळी मनाली यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना देवी, अर्धनारेश्वर, फायर मंडाला, समुद्र मंडाला यांची चित्रे भेट दिली.मनाली या एमबीए झाल्या असून त्या लेखिका व चित्रकार आहेत. लेखनाच्या माध्यमातून व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इस्त्राईल, स्वित्झर्लंड या देशांचा दौरा केला आहे.