संमेलनाला सगळेच कसे फुकट हवे

0
15

पुणे – अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला २५ लाखांचे अनुदान आधीच दिले आहे. आता संमेलनाचे आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रक्षेपणही फुकटात करण्याची मागणी पुढे येत आहे. या मंडळींना सारेच फुकट कसे हवे, अशा शेलक्या शब्दांत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे साहित्य महामंडळाला सुनावले.साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा उत्सव असतो. त्यासाठी राज्य सरकारने कित्येक वर्षांपूर्वीच अर्थसंकल्पीय तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे दरवर्षी राज्य शासन संमेलनातला आपला वाटा उचलत असतेच. यंदाचे वर्षही अपवाद नाही. असे असताना आता दूरदर्शन व आकाशवाणीवर संमेलनाचे फुकट प्रक्षेपण व ध्वनिक्षेपण व्हावे, ही अपेक्षा चुकीची आहे. मराठी ही वैभवसंपन्न आणि उत्कृष्ट भाषा आहे. तिच्या उत्सवासाठी कुणीही पैसे देईल, अशी स्पष्टोक्ती तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या मंडळींना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट कशी काय फुकट हवी असते, हे समजत नाही, असेही तावडे म्हणाले.