ग्राहक न्यायालयने काढली ८८९ प्रकरण निकाली

0
9

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात ३१ डिसेंबर २००२ पासून ग्राहक न्यायालय सुरू करण्यात आले. स्थापनेपासून आतापर्यंत ९८७ प्रकरणे ग्राहकांनी दाखल केले. त्यातील ८८९ प्रकरण निकाली काढण्यात आले. तर ९८ प्रकरण न्यायमंचाकडे आहेत.

विद्युत देयके, विमा कंपनी, गॅस एजेंसी, फायनांन्स, बँक, सोसायटी, डॉक्टर, दुकानदार, होलसेलर, मोबाईल, रेल्वे विभाग अशा विविध शासकीय व खासगी विभागांशिवाय व्यवसायीकांविरूध्द तक्रारी करण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सोप्या पध्दतीने तक्रार दाखल करण्यात येते. तक्रारीचे निवारण ३ महिन्यांत व जास्तीत जास्त ६ महिन्यांच्या काळात केले जाते. ग्राहक न्याय मंचकडे तक्रार दाखल करण्याची मर्यादा २० लाख रूपये आहे. तक्रार एक लाखापर्यंत असेल तर १०० पोस्टल आॅर्डर तक्रारी सोबत जोडावे लागते. एक ते पाच लाख पर्यंत २०० रूपयांचा पोस्टल आॅर्डर, पाच ते दहा लाखांपर्यंत ४०० रूपये व १० लाख ते २० लाखांपर्यन्त तक्रार दाखल करायची असल्यास ५०० रूपयांचा पोस्टल आॅर्डर जोडावा लागतो.

अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने तक्रारदाराला आपली तक्रार नोंदविण्याची सोय असल्याने तसेच ग्राहकांना यातून न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा विश्वास ग्राहक न्याय मंच प्रती वाढत चालला आहे. हेच कारण आहे की, नागरिक आता ग्राहक न्याय मंचकडे आपल्या तक्रारी मांडण्यासाठी पुढाकार घेत आहेत. परिणामी ग्राहक मंचकडे एवढ्या मोठ्या संख्येत तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

तर ग्राहकांना न्याय मिळवून देत न्याय मंचने आतका पर्यंत ८८९ प्रकरणांचा निपटारा करून ग्राहकांना संतूष्ट केले आहे. शिवाय प्रक्रियेत असलेले ९८ प्रकरण लवकरच निकाली काढून ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहे