संघाच्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी

0
19

नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपाला कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. सरकार्यवाह म्हणून भैय्याजी जोशी यांची शनिवारी प्रतिनिधी सभेत फेरनिवड करण्यात आल्यानंतर उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळच्या कार्यकारिणीत अनेक बदल करण्यात आले असून काही नवीन प्रचारकांना संधी देण्यात आली आहे.
बौद्धिक प्रमुख असलेले भागय्या यांच्यावर आता सरसहकार्यवाह, तर सुनील कुळकर्णी यांच्यावर शारीरिक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे, तर सुनील देशपांडे यांच्यावर सहसंपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी सहसंपर्क प्रमुख राम माधव होते. मात्र, ते भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या जागी सुनील देशपांडे यांना घेण्यात आले. कुळकर्णी आणि देशपांडे यांना प्रथमच कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. गेल्या कार्यकारिणीत शारीरिक प्रमुख असलेले अनिल ओक यांना सहव्यवस्था प्रमुख करण्यात आले असून सहव्यवस्था प्रमुख असलेले मंगेश भेंडे यांच्याकडे व्यवस्था प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. सहबौद्धिक प्रमुख म्हणून मुकुंद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. पूर्वी ही जबाबदारी महावीर यांच्याकडे होती. मात्र, त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आले. संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्वी हस्तीमल यांच्यावर जबाबदारी होती. मात्र, त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आले.
*सरसंघचालक- डॉ. मोहन भागवत
*सरकार्यवाह- भैय्याजी जोशी
*सहसरकार्यवाह- सुरेश सोनी,
दत्तात्रय होसबळे, डॉ. कृष्ण गोपाल आणि व्ही भागय्या.
*शारीरिक प्रमुख- सुनील कुलकर्णी
*सहशारीरिक प्रमुख- जगदीश प्रसाद
*बौद्धिक प्रमुख- स्वान्तरंजन
*सहबौद्धिक प्रमुख- मुकंद
*सेवाप्रमुख- सुहास हिरेमठ
*सहसेवा प्रमुख- अजित महापात्रा, गुणवंत कोठारी
*व्यवस्था प्रमुख- मंगेश भेंडे, साकलचंद बागरेचा
*सहव्यवस्था प्रमुख- अनिल ओक
*प्रचार प्रमुख- मनमोहन वैद्य
*सहप्रचार प्रमुख- जे. नंदकुमार
*संपर्क प्रमुख- अनिरुद्ध देशपांडे
*सहसंपर्क प्रमुख- अरुण कुमार, सुनील देशपांडे
*प्रचारक प्रमुख- सुरेशचंद्र
*सहप्रचारक प्रमुख- विनोदकुमार, अद्वैत चरणदत्त
*सदस्य- मधुभाऊ कुळकर्णी, शंकरलाल, डॉ. दिनेश, मुकुंद पणशीकर, इंद्रेश कुमार, सुनीलपद गोस्वामी, अशोक बेरी, हस्तीमल, महावीर,
साकलचंद बागरेचा, डॉ. आर. वन्नीराजन, व्ही नागराज, डॉ. जयंतीभाई भाडेसिया, अशोक सोहनी, डॉ. भगवती प्रकाश, बजरंगलाल गुप्त, दर्शनलाल, डॉ. देवेंद्र प्रतापसिंह, सिद्धीनाथसिंह, अजयकुमार नंदी, असीमकुमार दत्त
*निमंत्रित सदस्य- मदनदासदेवी, बालकृष्ण त्रिपाठी, सेतुमाधवन