36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ रखडलेल्या प्रकल्पांसाठी आठ कोटी द्या

रखडलेल्या प्रकल्पांसाठी आठ कोटी द्या

0
27

देवरी : देवरी, आमगाव व सालेकसा या तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पुन्हा सुरु करण्याकरीता क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुंबई मंत्रालयात आमदार पुराम यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांन भेटून क्षेत्रातील तमगड, मानागड, सातबहिनी, भसभोळण, तुमडी, मेंढा हे रखडलेले सिंचन प्रकल्प सुरु करण्याकरीता आठ करोडची मागणी केली आहे. जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार पुराम यांनी म्हटले आहे की क्षेत्रातील शेतकरी हा फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. क्षेत्रातील हे सिंचन प्रकल्प सुरु झाल्याने हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येणार. यावेळी नामदार महाजन यांनी प्रकल्प सुरु करण्याकरिता आवश्यक असलेली मदत लवकरात लवकर देण्याचे आश्‍वासन दिले.