फाळणीनंतर भारत-पाकिस्तानदरम्यान पहिल्यांदाच सुरू झाली होती ‘दोस्ती बस’

0
18

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान आजच्या दिवश‍ी (16 मार्च 1999) ‘दोस्ती बस’ सेवा सुरू केली होती. ही बस दिल्ली ते लाहोरपर्यंत धावत होती. दोन्ही ठिकाणांतील अंतर एकूण 528 किलोमीटर आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत, हा या मागचा उद्देश होता. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर बससेवा थांबवण्यात आली. यानंतर जुलै 2003 मध्ये ही सेवा पूर्ववत करण्यात आलीविशेष: पाकिस्तानने नुकतीच मैत्री बससेवा मर्यादित केली आहे. आता ही बस वाघा सीमेजवळील नानकानासाहिब शहरापर्यंत सुरू आहे.