मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी आणि बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला. त्यांच्या शिक्षण आणि समाजकार्य या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १८६१ रोजी अलाहाबादमध्ये झाला होता. त्यांनी काही वर्षे वकिलीचा व्यवसाय केला होता.

यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.