वेगळ्या विदर्भासाठी अजूनही आग्रही-मुख्यमंत्री फडणवीस

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर : बहुमताचा मॅजिक फिगर मिळविण्यासाठी एकीकडे शिवसेनेसोबत चर्चा सुरू असताना भाजपाची वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका काय असेल, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु वेगळ्या विदर्भाबाबत भाजप अजूनही आग्रही असल्याची बाब खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. शिवाय पाठिंब्यासंदर्भात शिवसेनेसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी वरील भूमिका मांडली.

गडचिरोलीत प्री पोलीस टड्ढेनिंग
पोलीस भरती प्रक्रिया ब-यापैकी पारदर्शक झाली आहे. यात थोड्या सुधारणेची गरज आहे. गडचिरोलीतून प्रशिक्षित युवक पोलीस खात्याला मिळावेत, यासाठी प्री पोलीस टड्ढेनिंगची व्यवस्था करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शिवाय गडचिरोलीतील नक्षलवादासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली असून, निरनिराळे मुद्दे विविध पैलूंनी समजवून घेतले आहेत. नक्षलग्रस्त भागात सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे देखील ते म्हणाले.

छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही आमची तात्विक भूमिका आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता आली असली तरी आम्ही त्यावर अजूनही कायम आहोत. वेगळ्या विदर्भाची निर्मिती कधी करायची, याचा निर्णय केंद्रातील श्रेष्ठी करतील. ती कधी होईल, हे मी सांगू शकत नसलो तरी राज्याच्या निर्मितीची पद्धत मात्र स्पष्ट आहे.
तेलंगणा नव्हे तर छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर विदर्भ राज्य तयार होईल. महाराष्ट्र अन् विदर्भ या दोन्ही राज्यांचा विकास झाला पाहिजे यावर भर देण्यात येईल, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाबाबत भाजप अजूनही आग्रही असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय विदर्भातील समस्या मार्गी लागाव्यात याकरिता मंत्रालयात विशेष पाठपुरावा यंत्रणा उभारण्यात येईल, अशी घोषणादेखील त्यांनी केली. प्रत्येक विभागातील आवश्यक व अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विभागीय अधिका-यांकडून पाठविण्यात आल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून ठराविक कालावधीने त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. यामुळे प्रलंबित मुद्दे मार्गी लागण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी पूर्व विदर्भातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व सीईओ ङ्मांच्ङ्माशी रामगिरी निवासस्थानी बैठक घेऊन समस्ङ्मांची महिती घेतली.