32.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Featured News भारतरत्नांची प्रेरणा घेवून घडतील भारतरत्न : जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

भारतरत्नांची प्रेरणा घेवून घडतील भारतरत्न : जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
33

पिंडकेपार येथे भारतरत्न दर्शक कक्षाचे उद्घाटन
जिल्हाधिकाºयांनी साधला विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद
गोरेगाव,दि.31 : देशात विविध क्षेत्रात आदर्श ठरलेले आपले भारतरत्न आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून आजचे विद्यार्थी भविष्याचे भारतरत्न होऊन देशाला पुढे नेतील. त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेले भारतरत्न दर्शन कक्ष हे स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील पिंडकेपार जि.प.शाळा ही पहिलीच ठरली आहे. असे उपक्रम प्रत्येक शाळेत व्हावे, यासाठी निश्चितच प्रयत्न करणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल शाळा पिंडकेपार येथे बुधवारी (दि. २९) रोजी भारतरत्न दर्शक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख्याने सरपंच दुलीचंद रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरत घासले, राजेंद्रसिंह राठोड, गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, विस्तार अधिकारी एस.बी.खोब्रागडे, केंद्र प्रमुख बी.बी.चौधरी, मुख्याध्यापक पि.डी.पटले आदि मान्यवर उपस्थित होते. blank
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांनी विद्यार्थी व पालकांशी मुक्तपणे संवाद साधून त्यांच्याकडून उपस्थित प्रश्नांचे मनमोकळेपणाने उत्तरे दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘तुम्ही जिल्हाधिकारी कसे झाले’, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आदि प्रश्न उपस्थित केले. यावर जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी विद्यार्थ्यांचे समाधान करताना अभ्यास कसे करावे, याचा मुलमंत्र दिला. तसेच आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगून मनमोकळी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी सुध्दा या संधीचा लाभ घेत जिल्हाधिकाºयांसोबत छायाचित्र काढून आनंद व्यक्त केला. अध्यक्षीय मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी हिवारे यांनी दुर्गम भागात एवढी सुंदर शाळा व भारतरत्न दर्शन कक्ष तयार करण्याची संकल्पना राबविणे फार आनंददायक असून इतर शाळांनी पिंडकेपार शाळेचा आदर्श घ्यावा, असे सांगून शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक-पालकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक पी.डी.पटले यांनी तर आभार शिक्षक मुनेश्वर कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी खुमेंद्र बिसेन, रमेश बिसेन, राजाराम गाते, वनिता सोनवाने, प्रितीबाई मेश्राम, दुर्गाबाई रहांगडाले, प्रमिला साखरे, शामकला जोशी, कविता राऊत, दिक्षा पटले, राज रहांगडाले, दुर्योधन पटले, शिक्षक एस.आर.ब्राम्हणकर, पी.एल.पारधी, वाय.बी.बोपचे, एम.पी.कटरे आदिंनी परिश्रम घेतले.
…………………..
८० वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
जि.प.शाळा पिंडकेपार ची स्थापना सन १९४७ मध्ये करण्यात आली. यावेळी गावातील फक्त ४ ते ५ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेतून शिक्षण घेतलेले प्रथम विद्यार्थी म्हणून गावातील गोवर्धन कोदू मेश्राम (८०) या माजी विद्यार्थ्याचे जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते भारताचे संविधान देवून सत्कार करण्यात आले. हा प्रसंग जिल्हाधिकारी बलकवडे यांच्यासाठी अविस्मरणीय असाच ठरला. या क्षणाची आठवण रहावी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या आग्रहाने जिल्हाधिकारी यांनी जांभुळचे रोपटे शाळा परिसरात लावले.
……………………..
भारतरत्न दर्शन कक्ष माजी विद्यार्थ्यांची संकल्पना
आपली शाळा या स्पर्धेच्या युगात टिकून रहावी, यासाठी पिंडकेपार जि.प.शाळा विभिन्न उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना भौतिक सुविधेचा लाभ देत आहेत. याच दरम्यान या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एक चांगली संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रकारची शासकीय मदत न घेता स्वखर्चातून शाळेत भारतरत्न दर्शन कक्षाचे निर्माण करून देशातील भारतरत्न प्राप्त ४८ विभुतींचे त्यांच्या केलेल्या कार्यांच्या उल्लेखनिय माहितीसह छायाचित्राची गॅलरी तयार करण्यात आली. अशा प्रकारची गॅलरी असणारी राज्यातील जि.प.शाळा पिंडकेपार एकमेव असावी, असाही उल्लेख मान्यवरांनी केला.