29.7 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home Featured News शहर थांबले पण माणुसकी थांबली नाही !

शहर थांबले पण माणुसकी थांबली नाही !

लॉकडाऊन मध्ये दिव्या फाउंडेशन देत आहे उपेक्षीतांना दोन वेळचे जेवण 

0
277

बुलडाणा(राजेश सोनुने)दि.27 : कधीही न थांबणारे शहर कोरोनामूळे थांबले. सर्वत्र लॉकडाऊन आहे. या परीस्थितीत माणुसकी मात्र थांबली नाही. लॉकडाऊनमूळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. हॉटेल बंद दूकाने बंद. मग भिकारी, अंध-अपंग निराधार पोटभर जेवणार कुठे? या प्रश्नाला हात घालत दिव्या फाऊंडेशनने माणुसकीचा ओलावा जपत अनेक उपेक्षीतांना पोटभर जेवण दिले. २३ मार्चपासून हा अन्नदानाचा उपक्रम दररोज दोन वेळ अन्न वाटप सुरूच असून पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी, बिस्कीटाचे वाटप करीत आहे. जोपर्यंत लॉकडाऊन राहील तो पर्यंत कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्या फाउंडेशनचे अशोक काकडे यांनी सांगितले आहे.

‘ दिव्या फाऊं डेशन ’ ही निराधार, मनोरुग्णांच्या समस्यांचे निवारण व्हावे यासाठी पाठपुरावा करणारी संस्था आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनच्या काळात पैसे असणारे सक्षम लोक घरात राहून उपजिवीका भागवू शकतात. मात्र रस्त्यावरील भिक्षेकरी, मनोरुग्ण किंवा निराश्रीत, गरजूंचे अन्नाविणा प्रचंड हाल होत असल्याची भावना लक्षात घेऊन त्यांच्या पोटप्रश्नसाठी

“लॉकडाऊनमध्ये भुकेल्यांना दोन घास खाता यावे ” यासाठी दोन वेळच्या जेवणाचा उपक्रम हाती घेण्यात आला  आहे. भुकेलेल्याला अन्नदान करण्यासारखे दुसरे पूण्य नाही. “दानात पूण्य आणि सेवेत आनंद” असे ब्रिद घेऊन शहरातील बसस्थानक परीसर, संगम चौक, कारंजा चौक,जांभरुण रोड, गजानन महाराज चौक, धाड नाका, त्रिशरण चौक, चिखली रोड, खामगाव रोड, मलकापूर रोड, यासह महाराष्ट्रतील गोदिया, मुंबई, सालेकास व निवारा केंद्र या भागात वरण- भात, भाजी- पोळी , असे मेनु असलेले जेवण गरजूंना देण्यात आले. हा जेवणाचा खर्च दिव्या फाउंडेशनच्या सदस्यां कडून तसेच काही दान शूर दात्याकडून केल्या जात आहे. यासाठी संस्थपक अध्यक्ष अशोक काकडे सह राजेंद्र मोरे, गजानन अवसरमोल, आशिष खडसे, सुनिल गवई, चंदूकुमार बहेकर, मीना जगताप, श्वेता माळी, संध्या फुंडे, नंदू सावजी, गजानन घिरके , भूषण वाठोरे, अशोक राजनाकर आदी पुढाकार घेत आहेत.

एवढं करा …..आव्हान ……
दिव्या फाऊंडेशन जरी हा उपक्रम निस्वार्थ सेवा लॉकडाऊनमध्ये राबवत आहे. यामध्ये आपणही सहभागी होऊ शकतात. एवढे करा आपल्या परिसरात कोनी भुकेला असला तर कृपया दिव्या फाउंडेशनशी संपर्क साधा
.जेणे करून त्यांना तुमच्यामुळे पोटभर दोनवेळचे जेवण भेटेल. आमच्या सहकार्याचे नंबर 9260008002/9657491392/7744939520