नागपूर,दि.09 – वसुंधरा सोशल फॉउंडेशन नागपूरमार्फत उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी याकरीता झाडांना पक्षी जलपात्र बांधणे उपक्रम राबविण्यात आले.उन्हाळा दिवसे दिवस तीव्र होत असून पाण्यासाठी पक्षांना त्रास होत आहे. माणुस कुठूनही पाणी उपलब्ध करुण आपली तहान भागवेल पण मुक़्या जनावरे पशु पक्ष्याचे काय, त्याकरीता त्यांनाही पाण्याची सोय करणे आपली जबाबदारी समजून वसुंधरा सोशल फॉउंडेसन नागपूरच्या माध्यमातून अभिषेक दिक्षीत एकमत नगर यांच्या घरापासून या जलपात्र बांधण्याच्या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे.
वसुंधरा सोशल फॉउंडेशन निसर्ग प्रेमी संस्थेच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षा पासून सातत्याने पर्यावरण व पक्षी सर्वधनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यावेळी बुद्ध पौर्णिमा निमित्त पंक्ष्यांची तहान भागविण्यासाठी तसेच त्यान्या क्षणभर विंश्रातीसाठी पाण्याचे 200 जलपात्र उद्यानात व रस्त्यावरील झाडांना लावण्यात आले आहे. या कार्यात
अभिषेक दिक्षीत, प्रतीक शिंगाडे, ज्योस्ना इंगळे, सारिका ठाकरे, समीर काळे, मनीष धकाते, राकेश घाडगे, मयूर खोरगडे, शुभम राऊत, यशवंत लिगाईत, शुभम पाऊलझगडे सहभागी झाले होते.





