28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Featured News पहिला पाऊस****

पहिला पाऊस****

सौ.भारती दिनेश तिडके,  रामनगर गोंदिया. 8007664039

0
210
“नेमचि येतो मग पावसाळा”असे आपण म्हणत असलो तरी नित्यनियमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्यापूर्वी उन्हाळा असतो.आणि ग्रीष्माच्या भव्य कढ ईत आपल्या देहाची अगदी लाहीलाही उडालेली असते. त्यामुळे पहिला पाऊस हवाहवासा असणारा पाहुणा ठरतो. दरवर्षी मी त्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते. मला पावसात भिजायला खूप आवडते. हा पाऊस जसा माणसाचे मन  रिझवतो, तो माणसाचे जीवनही फुलवतो. या पावसावरच माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने अवलंबून असते.
पाऊस येण्यापूर्वी सारी धरित्री अगदी तापून निघालेली असते. जमिनीला भेगा पडलेला असतात. झाडे पाणी पाण्यासाठी आसुसलेली असते. दिवसाकाठी सर्वांचे डोळे पाच-दहा वेळा तरी आकाशाकडे वळत असतात. पण लबाड मेघ मात्र मानवाला हुलकावणी देत असतात.
आज नक्की पाऊस कोसळणार असे त्यादिवशी वाटू लागते, तो सारा दिवस आणि ती सारी रात्र कोरडी जाते. मग माणूस काळा मेघांची कुंडली मांडतो. मल्हार राग गाऊन त्याला आळवतो. प्रतीक्षा करत राहतो.
अशा अवस्थेत एखाद्या दिवशी अचानक नभांगण आतील राग रंग बदलतात., आणि टपोरे थेंब कोसळू लागतात. मला तर पहिला पाऊस खूप आवडतो त्या पावसात भिजायला खूप मजा येते. झाडे पाने पशुपक्षी पावसाच्या आगमनाने आनंदित होतात. पावसात नाचणारी मुले पाहिली तर मन अगदी प्रसन्न होते. धरतीमाता देखील प्रसन्न होते. शेतकऱ्यांना तर फार आनंद होतो. त्यांची लगबग शेतीची कामे करण्याची सुरू होते. मला पावसाळा खूप आवडतो.
पाऊस हा खरोखरच आपला जीवनदाता आहे. पण केव्हा केव्हा त्याचा रोषही तापदायक असतो. कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. कधी हा पाऊस रुसून बसतो तर कधी रागारागाने दिवस-रात्र बरसत असतो. तेव्हा मात्र हा पाऊस नकोसा वाटतो.परंतु जेव्हा पाऊस येतो तेव्हा चैतन्याची सनद घेऊन सृष्टीचे सौभाग्य घेऊन येतो. म्हणून मला पाऊस खूप आवडतो.