28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home रोजगार/व्यापार आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलद्वारे रोजगार उपलब्ध करुन दयावे

आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलद्वारे रोजगार उपलब्ध करुन दयावे

0
133

 भंडारा, दि.18 – कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हयातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वेबपोर्टलचा लाभ घेवून बेराजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

या परिस्थितीत बेरोजगार झालेल्यांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी  करावी. खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनीही महास्वयंम पोर्टलचा लाभ घ्यावा. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा कार्यालयामार्फत सेवा सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये रिक्त पदे अधिसूचित करणे, बेरोजगार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळ, माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग,रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्त पदे अधिसूचित करणे, कौशल्य विकास प्रशिक्षित उमेदवारांची माहिती, मनुष्यबळ माहिती, पर्श्वभूमी नोंदणीबाबत सुविधा (ईआर-1) www.mahaswayam.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बेरोजगार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर संबंधितांना प्राप्त होऊ शकतो. संबंधित आस्थापनेतील रिक्त पदांची नोंदणी वेबपोर्टलवर प्राप्त युजर ईआर-1 ची सांख्यिकी माहिती प्रत्येक  तिमाहीनंतर प्रत्येक महिन्याला भरण्याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडियम, क्रिडा संकुल भंडारा दुरध्वनी क्रमांक 07184- 252250 वर संपर्क साधावा.