लोकमतच्या ‘आरक्षणविरोधी’ लेखाविरोधात नागरिकांचा उद्रेक

0
5

विशेष प्रतिनिधी
नागपूर,दि.3- आरक्षणाविषयी आक्षेपार्ह वृत्त छापल्याचा निषेध करत विविध मागासवर्गीय संघटनांतर्फे आज दुपारी वर्धा रोडवरील लोकमत वृत्तपत्र कार्यालयासमोर खा. विजय दर्डा यांच्या विरोधात निदर्शने केली. तसेच लोकमतच्या प्रती जाळल्या. यापूर्वी सकाळी इंदोरा चौक येथे या वृत्तपत्राच्या प्रती जाळून दलित संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. जातीय आरक्षण संपायला हवे या आशयाचा लेख राज्यसभेचे खासदार व लोकमत समूहाच्या संपादकीय बोर्डाचे चेयरमन विजय दर्डा यांनी ३१ ऑगस्ट च्या वृत्तपत्रात लिहिला.आरक्षणाविषयी वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखाच्या निषेधार्थ नागपुरातील इंदोरा चौक येथे त्या वृत्तपत्रांच्या प्रती जाळून दलित संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. जातीय आरक्षण संपायला हवे या आशयाचा लेख या वृत्तपत्रात छापून आल्याचा निषेध केला गेला.याचे पडसाद पुर्ण राज्यात पडत असून परभणी येथे सुध्दा भीमसेनेच्यावतीने लोकमत वृत्तपत्राची होळी करण्यात आली.आरक्षणविरोधी लेखन केल्याचा विरोध म्हणून लोकमतवृत्तपत्र बहुजनांच्या घरातून बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते,त्यानुसार नागपूर 1780,मुंबई-1137,नांदेड 984,औरगांबाद 923,परभणी 356,बीड 390,जालना शहरातून 267 अंक बंद करण्यात आल्याचे बोलले जात असून ही मोहीम अधिक त्रीव करण्याचे आवाहन दलित संघटनासंह बहुजनसंघटनानी केले आहे.