सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनला भेट

0
9

नवी दिल्ली ,दि.3- : केंद्र सरकारच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या’ धर्तीवर राज्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान’ स्थापन करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनला भेट दिली.

श्री. बडोले यांनी 15 जनपथ रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनला भेट देऊन फाऊंडेशनच्या कामाविषयी येथील अधिकाऱ्‍यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उप सचिव दिनेश डिंगरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष राज्य शासनातर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात त्यानिमित्ताने घेण्यात येणाऱ्‍या विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी 125 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर राज्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान’ स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला होता.(साभार महान्युज)