जनता परिवारातून मुलायमसिंह बाहेर, बिहारमध्ये स्वबळावर लढणार

0
12

लखनौ दि. ३ — बिहार विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षाने ‘एकला चलो रे’ धोरण स्विकारले आहे. पक्षाचे महसचिव रामगोपाल यादव यांनी बिहारमधील जनता परिवाराच्या महायुतीमधून समाजवादी पक्ष बाहेर पडला असल्याचे गुरुवारी सांगितले. ते म्हणाले, पक्षाच्या संसदीय बैठकीत याचा निर्णय झाला आहे. सपा किती जागा लढविणार हे मुलायमसिंह स्वतः कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवणार असल्याचे यादव म्हणाले.गाजावाजा करत एकत्र आलेला जनता परिवार अवघ्या काही महिन्यांमध्ये दुभंगला असून समाजवादी पक्षाने जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार असल्याने बिहारमधील महाआघाडीही विस्कटली आहे.