ई टेंडर पद्धतीवरून उद्धवाने टोलचे राज्य सरकारचे कान

0
9

मुंबई दि. १४-राज्य सरकारच्या ई टेंडरींग पद्धतीवर उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. मुंबईतील बोरिवली नॅशनल पार्कमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.ठाकरे पुढे म्हणाले की, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चीक कामांसाठी ई टेंडरीग करणं सक्तीचे आहे, तर तीन लाखच काय तीन रुपयांसाठीही ई टेंडरींगचा मार्ग अवलंबवावा. पण कामं करा. प्रत्यक्षात कामं किती होतात. जर कामचं होत नसतील तर ई टेंडरींगचा उपयोग काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहीजे असं सुचवित असतानाच राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले आहे.