मुंबई दि. १४- मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे आज (सोमवारी) छत कोसळले. काहीच दिवसांपूर्वी या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी अचानक छत कोसळल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.मुख्यमंत्र्याच्या दालनातील नव्याने बांधकाम करण्यात आलेले 50 फूट फॉल सिलिंग कोसळल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. दरम्यान, ही घटना रात्री घडल्यानं यामध्ये कोणतेही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम विभागाच्या सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मंत्रालायतील आगीनंतर सुसज्ज आणि अद्यावत असं कामं केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नूतनीकरणानंतर अवघ्या काही महिन्यांत घडलेल्या घटनेनं बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.