पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना

0
22

नागपूर ,दि.10: मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाणार आहे. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता पहिल्या वर्षासाठी १५३.२३ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून १८ वर्षापर्यत ३१११.१८ रुपये एवढा खर्च करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन करतांना सांगितले.
निवेदनामध्ये माहिती देतांना पंकजा मुंडे यांनी सांगितले, माझी कन्या भाग्यश्री ही योजना राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एक मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थी मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये, मुलगी ५ वर्षे वयाची होईपयर्ंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षाकरिता १0 हजार रुपये, मुलीच्या ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणा दरम्यान पोषण आहार व इतर खचार्साठी ७ वर्षाकरिता एकूण २१ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे. ज्या मातेला एक मुलगी असून दुसर्‍या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्याकरिता २ हजार ५00 रुपये, दोन्ही मुली ५ वर्ष वयाच्या होईपयर्ंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षासाठी १0 हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ५ वर्षासाठी १५ हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ७ वर्षासाठी २२ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र एक मुलगी व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबात जन्मणार्‍या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत २१ हजार २00 रुपयाचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपयाच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे.