आंतरजिल्हा बदली शिक्षकांना न्यायाची प्रतीक्षा

0
13

नागपूर : विभक्त कुटुंब पद्धतीचे तोटे अनेकवेळा चर्चिले जातात. मात्र शासनाच्या धोरण लकव्यामुळे जिल्हापरिषदांच्या शिक्षकांना कुटुंबापासून विभक्त राहण्याची पाळी आली आहे. राज्य शासनाने २00३ पासून जि.प. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियाच बंद केल्यामुळे शिक्षकांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बदली प्रकरणामध्ये सध्या असलेल्या शासननिर्णयामुळे अनेक शिक्षक आंतरजिल्हा बदलीपासून वंचित आहेत. जिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. मॉरिस कॉलेज मैदानावर धरणे देताना आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेत असलेले शिक्षक.
संघटनेचे अध्यक्ष अमर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात बदलीसाठी तब्बल २५ हजार शिक्षकांचे अर्ज प्रलंबित आहेत. हे शिक्षक १0 ते १५ वर्षांपासून बदलीसाठी ताटकळत आहेत. धक्कादायक म्हणजे, बदलीसाठी पात्र असलेल्या जि.प.च्या शिक्षकांना डावलून खाजगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याचे संघटनेचे संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले.