देवरी तालुक्यात बीएसएनएल सेवेचे तीनतेरा

0
10

खासगी कंपन्यांना आले सुगीचे दिवस

देवरी- तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या भारत संचार निगमच्या मोबाईल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. दूरध्वनी ग्राहकांची अवस्था सुद्धा फारशी चांगली नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक अन्य सेवापुरविणाèया कंपन्यांकडे वळत असल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, अलीकडे भारत संचार निगम ने महाकृषी प्लॅन मध्ये बदल केला असून आता ही सेवा शेतकèयांना महागडी ठरू लागली आहे. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. खासगी मोबाईल कंपन्यांचे जाळे ही ग्रामीण भागात पसरले असून त्या कंपन्यांची सेवा अखंडित पणे ग्राहकांना मिळू लागली आहे. असे असताना आतापर्यंत सुरळीत सुरू असलेली बीएसएनएलच्या मोबाईलची सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. सकाळच्या वेळी तर अनेक भागात मोबाईलचा कव्हरेज गेलेला असतो. विद्युत पुरवठा खंडित झाला की अनेक ठिकाणी बीएसएनएलची सेवा बंद होते. या कालावधीत पर्यायी व्यवस्था म्हणून वापरात असलेल्या खासगी सेवा पुरवठा करणाèया कंपन्यांच्या रिचार्ज विक्रीत वाढ होते. गेल्या काही महिने लोहारा येथील दूरभाष केंद्र संपूर्णपणे बंद असताना ही ग्राहकांकडून जबरीने बिल वसूल केले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. स्थानिक प्रशासनाला यासंबंधी विचारणा केली असता आम्ही काहीही करू शकत नाही, असे ग्राहकांना उत्तरे देऊन मोकळे होतात. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात दिरंगाई केली जाते. यामुळे भारत संचार निगमचे ग्राहक कंटाळले असून त्यांनी आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खासगी कंपन्यांना फायदा पोचविण्यासाठी बीएसएनएलचे अधिकारी जाणून आपल्या ग्राहकांना त्रास देत तर नसावे ना? अशी शंका मोबाईलधारक व्यक्त करीत आहेत.