खासगी शिकवणी वर्गावर बंदी आणा-युवक काँग्रेची मागणी

0
7

नागपूर,दि.13- सध्याच्या परिस्थिति सम्पूर्ण देशभर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पुर्वप्रवेश परिक्षेच्या नावावर नागपूरसह राज्यातील अनेक शहर व जिल्हास्तरावर खासगी शिकवणी वर्गांनी आपला काळा व्यवसाय सुरु केला असून त्यावर तत्ताळ बंदी आणावी अन्यथा युवक काँग्रेस आंदोलन करणार अशा इशारा नागपूर युवक काँग्रेसच्यावतीने टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत युकां अध्यक्ष बंटी शेळके यांनी दिला.यावेळी नागपुर प्रवक्ता प्रशांत तन्नेरवार, पूर्व नागपुर अध्यक्ष प्रवीण पोटे, आलोक कोंडापुरवार, नीलेश देशभ्रतार, रोहित खैरवार इत्यादि युवक कांग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते

खासगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून पूर्व परिक्षेच्या नावावर लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.अनेक कोचिंग क्लासेस आपल्या उपराजधानी नागपुर शहरात आहे. ज्या मधे प्रामुख्याने IIT POINT,IIT HOUSE, ESPIRE, ICAD, RESONANCE इत्यादि नावे घ्यावी लागतील. ज्या मधे लाखो रुपयांचे शुल्क पालकांकडून उकळले जात आहे. मुलाच्या भविष्याच्या नावावर सुध्दा पालकवर्ग बळी आमिषाला बळी पडत असल्याचे शेळके म्हणाले.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याकडे लक्ष घालून सर्व खासगी शिकवणीवर तत्काळ बंदी आणावी अशी मागणी करीत लक्ष न दिल्यास शिक्षणमंत्र्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्यात सन् 2002 साली तात्कालीन मुख्यमंत्री स्व. विलास राव देशमुख यांच्या प्रमुख पुढाकारने खासगी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयात आकारण्यात येणाऱ्या भर्मसाठ फ़ीस वर निर्बंध लावन्याकारिता “शिक्षण शुल्क समिति” स्थापन केली होती आणि आजही महाराष्ट्र शासन या समिती अंतर्गत कार्य करीत आहे. जर खासगी महाविद्यालयावर शिक्षण शुल्क समिती बंधनकारक राहु शकते, तर खासगी कोचिंग क्लासेस वर का  नाही ? हा मुद्दा असल्याचेही शेळके यांनी पत्रपरिषदेत सांगितले.