महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून ध्वजवंदन

0
11

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हा विकास निधीतून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे झालेल्या नूतनीकरणाची पाहणी मंत्री श्री.ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे मंत्री श्री.ठाकरे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.