भाजपविरोधात बोलू नका!: उद्धव ठाकरे

0
12

मुंबई-सार्वजनिक ठिकाणी बोलताना, सोशल साइटवर मतप्रदर्शन करताना भाजपच्या विरोधात बोलणे टाळा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना नेते व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना औरंगजेब आणि अफझलखान म्हणून हिणवले होते. त्यामुळे आधीच तुटलेल्या युतीत कडवटपणा आला होता. मात्र, आता दोन्ही पक्षांना एकत्र येणे भाग पडले आहे.
गेल्या तब्बल दीड महिन्याच्या वाटाघाटीनंतर पुन्हा युती होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. भाजपनं शिवसेनेला पाच कॅबिनेट दर्जाची आणि सात राज्यमंत्रिपदं देऊ केली आहेत. शिवसेनेला ती मान्य असल्याचं सांगितलं जात असून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना सहभागी होईल, अशी चर्चा आहे. सुटत आलेली ही गणितं पुन्हा बिघडू नयेत म्हणून शिवसेनेने खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे.