राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी?

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे वृत्त असून आज संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल अशी चिन्हे आहेत. भाजपाने शिवसेनेला १२ मंत्रिपद द्यायची तयारी दर्शवली असून उद्योग, पर्यावरण, परिवहन, उत्पादन शुल्क ही खाती सेनेला मिळतील असे खात्रीलायक वृत्त आहेराज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तीन दिवस लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी, ५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. या विस्तारामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
शिवसेना आणि भाजपमधील युती अंतिम टप्प्यात आली असून, शिवसेनेला राज्याच्या मंत्रिमंडळात पाच कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्रीपदे देण्याची येण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली, तरी दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडून केवळ औपचारिक निर्णयाची घोषणा बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यामध्ये सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले असून, तिथे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.