नागपूर-पुणे आठ तासात ; गडकरी यांची घोषणा

0
19

नागपूर-पुणे ते नागपूर हा वेळखाऊ प्रवास आता अधिक जलद होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केलीये. पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन मार्ग जोडणार असल्याची गडकरी यांनी ट्विट करून सांगितलं.

नागपूर -पुणे प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी नवा मार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला जोडण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. एक्स्प्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला आठ तासांत पोहोचणं शक्य होईल, असं नितीन गडकरींनी म्हटलंय.

नागपूर-पुणे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे.
या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास अडीच तासांत आणि पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास साडेपाच तासांत करणं शक्य होणार आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे प्रवासासाठी हा मार्ग झाल्यानंतर आठ तासात वेळ लागेल, असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे