सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
12

दिलीप गावडे डेअरी आयुक्तपदी, स्वाती म्हसे-पाटील फिल्मसिटीच्या संचालक

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सहा आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी दिलीप गावडे यांना डेअरी विकास आयुक्त बनवण्यात आले आहे, तर फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कौशल्य विकास, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, खादी ग्रामोद्योग आदी विभागांमध्ये आपल्या कामाची छाप सोडलेल्या अंशु सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. रुबल अगरवाल यांना महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले आहे. रुबल यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. रमेश चव्हाण यांच्यावर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांची बदली सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.