तासगाव मध्ये भव्य सायकल रॅलीचे आयोजन

0
5

सांगली –जिल्ह्यातील तासगाव येथे मतदार जनजागृती निमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये तासगांव मधील महा विद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता तसेच शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला सायकल रॅली ची सुरुवात तासगावचे आराध्य दैवत श्री गणपती देवस्थान पासून सुरुवात होऊन स्टँड -विटा नाका- मार्गे परत सिद्धेश्वर मंदिर आणि नंतर गणपती मंदिर या मार्गे झाले तरी सायकल रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मतदार जागृती बाबत घोषणा दिल्या व मतदान टक्का वाढवण्यासाठी लोकांना व मतदारांना आवाहन केले सदरच्या सायकल रॅलीसाठी sveep नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड उपस्थित होते त्याचबरोबर तासगाव तालुक्याचे तहसीलदार आदरणीय रविंद्र रांजणे साहेब हे ही सायकल रॅलीसाठी उपस्थित होते व त्यांनीही सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला तसेच सर्व नव मतदार तसेच सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी लोकशाही बळकटी साठी मतदान गरजेचं आहे हे सांगितले त्याचबरोबर पंचायत समिती तासगाव मधील सर्व कर्मचारी सदरच्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार विस्ताराधिकारी राठोड यांनी मानले. चहापान झाल्यानंतर रॅली ची सांगता झाली.