गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद शाळेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
5

शिवणी /किनवट,दि१४/ गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद शाळेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिल्याची माहिती देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषत: शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी संबंधित विषयांवर परिसंवाद व त्यांच्या विचाराधारावर आधारित ग्रंथोउत्सव, चित्रकला स्पर्धा तसेच त्यांच्या कार्याशी संबंधित इतर नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते.. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विविध कार्यक्रमास आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थी ,माजी विद्यार्थी ,शिक्षक मुख्याध्यापक व सर्व ग्रामस्थ व वरिष्ठ मान्यवर व माता, पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.