15 व 16 एप्रिल रोजी आयटीआय देवरी येथे टपाली मतपत्रिकेचे मतदान

0
7

गोंदिया, दि.14 : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 66-आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीत मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या व मतदान पथकात नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यापैकी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी   नमूना-12 भरलेला आहे, त्यांचे टपाली मतपत्रिकेचे मतदान 15 व 16 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता पासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), देवरी येथील सुविधा केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घेऊन टपाली मतदान करण्यासाठी नियोजित स्थळी उपस्थित राहावे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.