देवरीत बीएसएनएल ठरलाय डोक्याला ताप

0
8

देवरी,(ता.२६)- देशात दूरसंचार क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली असताना आणि अगदी खेड्यापर्यंत ४-जी पोचण्याच्या बेतात असताना भारतीय संचार निगम ही सरकारी क्षेत्रातील संस्था मात्र सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही. परिणामी, माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेणाèया पिढीला बीएसएनएलच्या उदासीनतेचा फटका बसत आहे. देवरी तालुक्यात तर या कंपनीच्या मोबाईल धारकांना नेटवर्कचा प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. यामुळे बीएसएनएल म्हणजे नुसता डोक्याला ताप, असे संबोधन्याची पाळी बीएसएनएलधारकांवर आली आहे.
देवरी तालुका हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त तालुका म्हणून गणला जातो. यामुळे या तालुक्यात दक्षिणेकडील ग्रामीण भागात बीएसएनएलला खासगी पर्याय उपलब्ध नाही. याउलट तालुक्याच्या इतर भागात मात्र खासगी मोबाईल कंपन्या आपले जाळे पसरवीत आहेत. तालुक्यात बीएसएनएलच्या मोबाईल व दूरध्वनीची ग्राहक संख्या लक्षणीय आहे. असे असले तरी या कंपनीचे अधिकारी या तालुक्यातील दूरसंचार व्यवस्थेप्रती कमालीचे उदासीन असल्याचे वारंवार समोर आले आहे. ग्रामीण भागात तर नियमित देखभाल होत नसल्याने अनेक दिवस सेवा खंडित असते. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण होत नाही. यामुळे या कंपनीच्या दूरध्वनी संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील भ्रमणध्वनी सेवेची अवस्था सुद्धा फारसी वेगळी नाही. बीएसएनएलच्या मोबाईल धारकांना वेळेवर फोन लागत नसल्याने मानसिक त्रासाला नेहमीच सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकांचा लोंढा खासगी कंपन्यांकडे वळताना दिसतो. अलीकडेच देवरी येथे ३-जी सेवा सुरू करण्यात आली. सुरवातीला ही सेवा मिळाल्याने ग्राहकांत आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे ग्राहक बीएसएनएलकडे आकृष्ट व्हायला सुरवात झाली होती. मात्र, पुन्हा बीएसएनएलच्या अधिकाèयांनी इकडे सुद्धा दुर्लक्ष केल्याने शहरात सुद्धा ३-जी सेवा योग्यरीत्या मिळत नसल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. लँडलाइन असो की मोबाईल वा ३-जीसेवा, या सर्व प्रकारांना ग्राहक कमालीचे कंटाळले असून वरिष्ठ अधिकारी आणि खासगी मोबाईल कंपन्या यांच्याच हातमिळवणी झाली असल्याचे आरोप ग्राहक करीत आहेत.
सर्व शासकीय कार्यालयात याच कंपनीची इंटरनेट सेवा असल्याने सर्वच ऑनलाइन कामे वेळेत करता येत नाही. शिवाय बँqकग क्षेत्रालाही याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातून ५०-६० किमीचे अंतर कापून आलेल्या नागरिकांना वेळेवर qलकफेलची कारणे दाखवून आल्यापावली परत पाठविले जाते. परिणामी, तालुका वासीय सरकारला व सत्तेतील पदाधिकाèयांना हेच का ‘तुमचे अच्छे दिन‘ असा टोमणा मारण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या गंभीर प्रश्नाला तालुक्यातील आमदार व खासदारांनीसुद्धा गांभीर्याने घेतले नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.