पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केली:शरद पवार

0
10

कोल्हापूर : यापुर्वी छत्रपतीनी पेशव्यांची नियुक्‍ती केली, पण फडणविसांनी छत्रपतीची नियुक्‍ती कधी केली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या रुपाने प्रथम पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती करण्याची घटना घडली. आशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदारकीच्या निवडीवर टिपणी केली.खासदार पवार यांना संभाजीराजे यांची राज्यसभेवर झालेल्या नियुक्‍तीबद्दल विचारले असता ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांची निवड राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे भाजपने निवड केली असे म्हणता येणार नाही. पण राजकीय म्हणाल तर आजपर्यंत छत्रपती पेशव्यांची निवड करत होते. पेशवे फडणविसांची नियुक्‍ती करायचे. मात्र फडणविसांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याचे यापुर्वी कधी घडले नाही. यावेळी मात्र फडणविसांनी छत्रपतींची नियुक्‍ती करण्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे.