चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election Result 2024) काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आहे.२१ व्या फेरीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना ५ लाख ९९ हजार ५९६ मत मिळाली तर भाजपचे सुुधीर मुनगंटीवार यांना ३ लाख ७६ हजार ३११ मते मिळाली.धानोरकर यांचा २ लाख २३ हजार २८५ मतांनी विजय मिळविला आहे.
1998-99 मध्ये काँग्रेस जिंकली. 2004 ते 2014 पर्यंत ही जागा भाजपच्या ताब्यात राहिली आणि येथून हंसराज अहिर हे खासदार होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे येथून सुरेश नारायण धानोरकर भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवला.
पहिले काँग्रेसचे खासदार विजयी
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. हा ऐतिहासिक आणि जुना जिल्हा असल्याने 1951-1952 मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा या जागेचाही त्यात समावेश करण्यात आला. मुल्ला अब्दुल्लाभाई ताहेरअली हे काँग्रेस पक्षाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले.