ज्येष्ठ संशोधक, लेखक डॉ. रा.चिं. ढेरेंचे पुण्यात निधन

0
7

पुणे, दि. १ – ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर या कन्या आहेत. त्यांच्या निधनामुळे नव्या पिढीला साहित्य व इतिहासाशी जोडणारा महत्वपूर्ण दुवा निखळल्याची हळहळ साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.
मागच्या काही दिवसांपासून ढेरे यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर आज राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय इतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविदया संशोधनात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. या विषयांवर विपुल लेखन करीत त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली. ११.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मसाप येथे ठेवण्यात येईल. तर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.