पुणे-संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान (पंजाब) येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संत तुकाराम महाराज वंशज डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. त्यांचा परिचय….
डॉ. सदानंद श्रीधर मोरे, देहूकर
जन्म : २५ जून १९५२
शिक्षण : अकरावीपर्यंत देहू येथे, त्यानंतर पुण्यात स. प. महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी अहमदनगर येथील कॉलेजमध्ये अध्यापक
पुणे विद्यापीठातून ‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्युमन अॅक्शन’ या विषयावर पीएचडीचा प्रबंध, या प्रबंधास सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा दामले पुरस्कार.
पीएचडी मिळवल्यावर पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी यूजीसीचे खास अनुदान, त्याअंतर्गत ‘कृष्ण – द मॅन अँड हिज मिशन’ या विषयावर संशोधन.
पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक, तसेच विविध अध्यासने, मंडळे यावर समन्वयक, संशोधक म्हणून काम.
केंद्र, राज्य शासनाच्या विविध समित्या, मंडळे यावर सल्लागार म्हणून काम
याशिवाय विविध ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन, संपादन
साहित्यसंपदा
लोकमान्य ते महात्मा – साहित्य अकादमीप्राप्त ग्रंथ, अन्य १५ पुरस्कार
तुकाराम दर्शन – राज्य शासनाचे पुरस्कार व अन्य दहा पुरस्कार, गर्जा महाराष्ट्र
कवितासंग्रह
संदर्भाच्या शोधात, बखर, वाळूचे किल्ले
नाटक
उजळल्या दिशा, शिवचरित्र
आगामी संकल्प
महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर इतिहास