महाराष्ट्रात कुठे-किती मतदान? टक्केवारी समोर

0
197

मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून
९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के,रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के,वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

झाले आहे.

मुंबई शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत 6.25 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ८.३१ टक्के मतदान हे मलबार हिल मतदारसंघात झाले आहे. तर धारावी मतदारसंघात सर्वात कमी ४.७१ टक्के मतदान झाले आहे.  धारावीत 4.71 टक्के, सायन-कोळीवाडा: 6.52 टक्के, वडाळा 6.44 टक्के, माहीम: 8.14 टक्के, वरळी: 3.78 टक्के, शिवडी : ६.१२ टक्के, भायखळा: 7.09 टक्के, मलबार हिल: 8.31 टक्के, मुंबादेवी  6.34 टक्के आणि कुलाबा: 5.35 टक्के मतदान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. यात पालघर विधानसभा मतदान केंद्रात 5.94 टक्के, बोईसर विधानसभा 6.97 टक्के, डहाणू विधानसभा 8.5 टक्के, विक्रमगड विधानसभा 6.4 टक्के, नालासोपारा विधानसभा 7.48 टक्के, वसई विधानसभा 8.32 टक्के मतदान झाले आहे.तर सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.14 टक्के मतदान झाले आहे. यात फलटण 4.29 टक्के, वाई 4.92 टक्के, कोरेगाव 6.93 टक्के, माण 3.08 टक्के, कराड उत्तर 4.84 टक्के, कराड दक्षिण 5.63 टक्के, पाटण 4.68 टक्के, सातारा – 6.15 टक्के मतदान झाले आहे.