गोंदिया : आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा मतोत्सव असून मतदारांनी या मतोत्सवात सहभागी होवून प्रत्यकाने मतदानाचा हक्क बजावावा. महाराष्ट्रात महायुती सरकारने राबविलेल्या जनहित व लोककल्याणकारी योजनामुळे राज्यातील मतदार पुन्हा महायुतीला संधी देतील आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बहुमताने स्थापन होईल असा विश्वास गोंदिया येथे एन.एम.डी. महाविद्यालयात खासदार प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँगेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यानीही सहकुटुंब मतदान गोंदियात केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी नगरपरिषद शाळेत मतदान केले.
आज विधानसभा निवडणूक म्हणजेच आपल्या लोकशाहीच्या उत्सवात आमचा अधिकार बजावत योगदान दिले. बामणी सडक या मूळ गावी मी सपत्नीक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार पाडत उत्साहात मतदान केले. तुम्हीही जरूर मतदान करा असे आवाहन अपक्ष उमेदवार सुगत चंद्रिकापूरे यांनी सपत्नीक मतदानानंतर केले.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदावर राजकुमार बडोले यांनी सहकुटुंब मतदान केले. तसचे आघाडीचे उमेदवार दिलीप बनसोड यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंकात बोपचे यांनी हिरडामाली येथील जिल्हा परिषद शाळेत व महायुतीचे उमेदवार विजय रहागंडाले यांनी तिरोडा तालुक्यातील खमारी येथे मतदान केले.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा क्षेत्रातील आमगाव विधानसभेतील रिसमा, बूथवर सह परिवार मतदान केले यावेळी सौ. नलिनी किरसान, ऍड. दुष्यन्त किरसान, विधानसभा समन्वयक रामसिंग चौव्हान, आमगांव काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय बहेकार, जि प सदस्या छबुताई उके, महेश उके, बाबा मिश्रा, रामेश्वर श्यामकुवर सोबत उपस्थित होते