राज्य पोलिस दलातील ५०० अंमलदारांना पीएसआय पदावर पदोन्नती…

0
165
गोंदिया,दि.१०ः–महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील जवळपास ५०० विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या व पोलीस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रीत) या पदावर पदोन्नती देण्या बाबतच्या सन २०२४-२०२५ च्या निवड सूचीवरील पात्र अंमलदारांना स्थानापन्न २५ टक्के कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती देणेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे.

    राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक हे पद गट-ब (अराजपत्रीत) या दर्जाचे आहे व पदोन्नतीकरिता पात्र झालेले पोलीस अंमलदार हे पोलीस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रीत) या पदावर पदोन्नतीने नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे शासन अधिसूचना-महाराष्ट्र शासकीय गट “अ” व गट “ब” (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्ती साठी सदरहू पात्र अंमलदारांकडून महसुली विभागाची पसंती घेण्यात आलेली आहे.
    महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम-२२-न च्या तरतुदी नुसार पोलीस आस्थापना मंडळ क्र.२ यांना प्रदान असलेल्या अधिकारांचा वापर करुन, खालील नमूद पोलीस अंमलदारांना स्थानापन्न २५ टक्के कोट्यातील निःशस्त्र पोलीस उप निरीक्षक गट-ब (अराजपत्रीत) या पदावर आस्थापना मंडळ क्र.२ च्या मान्यतेनुसार निःशस्त्र पोलीस उप निरीक्षक या पदावर त्यांचे नावासमोरील रकाना क्र.५ मध्ये दर्शविण्यात आलेल्या घटकात पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.