गोरेगाव-तालुक्यातील सटवा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सटवा येथे 14 एप्रिल 2026 रोजी शाळेला संविधान पुस्तक तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांच्या जीवन चारित्र्यविषयी माहिती देणारे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रमेश ठाकूर तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, उपसरपंच विनोद पारधी, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ते भागचंद रहांगडाले, माजी उपसरपंच उमराव कडूकार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, विनोद उके, कुलदीप वैद्य, सहाय्यक शिक्षक धपाडे रंजीत राऊत आदी उपस्थित होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण व गीतगायन केले. याप्रसंगी उपसरपंच विनोद पारधी, माजी उपसरपंच उमराव कडुकर, सामाजिक कार्यकर्ते भागचंद रहांगडाले, माजी सरपंच रमेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार शालेय विद्यार्थी लावण्या रहांगडाले, अर्जुन राणे यांनी केले.




