26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home महाराष्ट्र राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या “बदल्या”गडचिरोलीचे नवे पोलीस अधिक्षक एम.रमेश

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या “बदल्या”गडचिरोलीचे नवे पोलीस अधिक्षक एम.रमेश

0
190
मुंबई,दि.२०- राज्य पोलिस दलातील भारतीय पोलिस सेवेच्या जवळपास ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
   सातारा जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त राहिलेले पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली नजिकच्याच सांगली जिल्ह्यात करण्यात आली आहे,तर पुणे शहर पोलिस आयुक्तालयात उपआयुक्त असलेले राजकुमार शिंदे यांना वाशिम जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे.  येत्या काही दिवसांत विदर्भातील काही जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत आहेत.गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक निलोत्पल यांची  कोल्हापूर येथे तर गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधिक्षक एम.रमेश यांना गडचिरोलीतच पोलीस अधिक्षक पदी नेमणुक देण्यात आली आहे.

blank