34.2 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home महाराष्ट्र हिरकणी कक्ष निर्मिती करणाऱ्या पुरवठादारांची प्रशिक्षणाच्या नावावर लाखोची लूट

हिरकणी कक्ष निर्मिती करणाऱ्या पुरवठादारांची प्रशिक्षणाच्या नावावर लाखोची लूट

0
31
फाईल फोटो प्रशिक्षण

बेरार टाईम्स एक्सक्लुझीव भाग -२

महिला व बाल विकास विभाग वादाच्या भोव-यात

खेमेंद्र कटरे/गोंदिया-राज्यतील विविध जिल्ह्यात हिरकणी कक्ष तयार करुन देणारे कंत्राटदार महालक्ष्मी एंटरप्रायजेस, महिला आधार औद्यो सहकारी संस्था व श्रीपाद इंटरप्रायजेस हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्याची धक्कादायक बाब मुंबई शहरात उघडकीस आली आहे.त्यातच यशदा प्रशिक्षकांचे मानधन हे व्याख्यात्याचा दर्जा, विषयाचे महत्त्व आणि सत्रयावर ठरवते. सामान्यतः तज्ज्ञ किंवा अतिथी व्याख्यात्यांना प्रतिसत्र सुमारे रु. १,००० ते रु. ४,००० पर्यंत मानधन दिले जाते.तर काही प्रकल्प संचालक/प्रशासकीय पदांचे एकत्रित मानधन दरमहा रु. ८०,००० इतके असते.मात्र मात्र महिला बालविकास विभाग मुंबई शहरच्यावतीने जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या प्रशिक्षणापोटी सुमारे ७.४९ लाख रुपयाचे मानधन तर २०२६ मध्ये २.८१ लाख रुपयाचे मानधन देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

blank
या प्रशिक्षणावर झालेला खर्च पुढीलप्रमाणे आहे.

मात्र सदर विवरणावरून दोन्ही प्रशिक्षणासाठी लाखो रुपयाची उधळण दरवर्षी मुंबई शहरच्या महिला व बाल विकास विभागाने केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात यशदा ही प्रशिक्षण देणारी संस्था असूनही हे प्रशिक्षण वस्तू पुरवठा करणाऱ्या व हिरकणी कक्ष उभारणाऱ्या संस्थांना कस काय दिले गेले याचे उत्तर मुंबईच्या महिला व बाल विकास विभागाकडे निश्चितच असेल. मुंबई शहर बालविकास अधिकारी विभागाने 20/01/2025 प्रमाणे संरक्षण समिती अध्यक्ष, सदस्य, संबंधित अधिकारी/ कर्मचारी अंगणवाडी सेविका प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तब्बल 43.85 लाखाची याशिवाय दि 20/01/2026 प्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध बंदी आणि निवारण) कायदा अंतर्गत जिल्ह्यातील सरकारी/निमसरकारी कार्यालय स्वयंसेवी संस्था आणि घरकामगारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले गेले.हे प्रशिक्षण सुद्धा वरील संस्थांनीच दिले गेले असून प्रशिक्षणाच्या नावावर 65.35 लाखाची लूट महिला व बाल विकास विभाग व वरील कंत्राटदारांनी केल्याचे कागदपत्रावरुन दिसून येत आहे.

blank
या प्रशिक्षणावर झालेला खर्च पुढीलप्रमाणे आहे.