सुशीलकुमारांनी २००० कोटींची संपत्ती कुठून गोळा केली?

0
9

सोलापूर : ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी २ हजार कोटींची संपत्ती कुठून गोळा केली असा सवाल, सोलापूर जिल्ह्यातले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलाय.

सोलापुरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात काढलेल्या हल्ला बोल मोर्चामध्ये आडम यांनी हा प्रश्न विचारला. प्रणिती शिंदे यांनी नुकताच सोलापुरात आडम यांच्या विरोधात संघर्ष मोर्चा काढला होता.

घरं देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन आडम यांनी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप तेव्हा प्रणिती शिंदेंनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी आडम यांनी हा हल्ला बोल मोर्चा काढला.

हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या. गृहनिर्माणची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर असून, आपण कोणाचीही फसवणूक केली नसल्याचा दावा आडम यांनी यावेळी केला. तर प्रणिती शिंदेंविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.