विज्ञान परिषदेच्या आयोजनाचा मान मुंबई विद्यापीठाला

0
12

मुंबई : तब्बल 54 वर्षानंतर यंदा मुंबई विद्यापीठाला विज्ञान परिषद आय़ोजनाचा मान मिळाला आहे. या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थींही उदघाटनावेळी उपस्थित राहणार आहेत.

3 ते 7 जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या या परिषदेचं आयोजन बीकेसीतील जवळपास 20 हजार चौरस फुटांच्या जागेवर करण्यात आलं आहे. मानवी विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग, अशी यंदाच्या परिषदेची थीम असून त्यासाठी देश-विदेशातल्या 850 हून अधिक प्रोजेक्टसचा सहभाग असेल.

काल कुलगुरु वेळूकर आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळं तब्बल 54 वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर मुंबईला विज्ञान परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाल्यानं प्रशासनानं जोरदार तयारी सुरु केल्याचं चित्र आहे.