मंत्रालयीन विभागाची संकेतस्थळे आता मराठीत

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई वृत्तसंस्था, दि. 28: इंग्रजी संकेतस्थळे असलेले सर्व मंत्रालयीन विभाग, शासकीय संस्था आणि महामंडळांनी ती तातडीने मराठीमध्ये करावीत, असा आदेश मराठी भाषा विभागाने शुक्रवारी काढला. सरकारी कामकाजात मराठीचा वापर वाढण्यासाठी शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, पत्रव्यवहार आणि संकेतस्थळे आदींमध्ये मराठीचा वापर करावा, असे परिपत्रक २९ जानेवारी २०१३ रोजीच काढण्यात आले होते. तरीही अनेक विभागांची संकेतस्थळे ही आजही इंग्रजीतच निघत आहेत. ती तत्काळ मराठीतून करावीत, असे परिपत्रक काढण्यात आले.
जवळपास ३२ मंत्रालयीन विभाग, संस्था आणि महामंडळांची संकेतस्थळे आजही इंग्रजीत आहेत. त्यात सामान्य प्रशासन विभाग, गृह, महसूल व वने, कृषी, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, कामगार, सार्वजनिक आरोग्य आणि सहकार व वस्त्रोद्योग विभागाचा समावेश आहे.