एक्स-रे साठी खासदार तुमानेंना केले स्टुलवर उभे

0
10

नागपूर,दि.28: गुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या एका खासदारांना मोडकळीस आलेल्या टेबलवर उभे करून ‘एक्स-रे’ करण्यात आला. मेडिकलच्या एक्स-रे विभागाच्या या प्रकारामुळे खासदारांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, गेल्या एक महिन्यापासून दोन एक्स-रे मशीन बंद असल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवरही धरले.
१४०० खाटांच्या या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु सोयी असून त्याला कार्यान्वित ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने रुग्णसेवेवर याचा प्रभाव पडत आहे. मेडिकलच्या क्ष-किरण विभागात चार एक्स-रे मशीन आहेत. यातील एक मशीन भंगारात काढण्यात आली आहे. तर मागील महिन्यात दोन मशीनची ट्यूब नादुरुस्त झाल्याने त्या बंद पडल्या आहेत. केवळ एकच मशीन सुरू आहे. परिणामी, एक्स-रे साठी रुग्णांवर दोन ते तीन तासांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. यातच सोमवारी खासदार कृपाल तुमाने गुडघे दुखण्याच्या उपचारासाठी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा यांच्याकडे आले असता त्यांना विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी सांगितले, डॉ. मित्रा यांनी तपासून एक्स-रे विभागात पाठविले. परंतु या विभागातील कर्मचाऱ्याने गुडघ्याच्या ‘एक्स-रे’साठी मोडकळीस आलेल्या स्टूलवर उभे केले.