25.7 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home महाराष्ट्र रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार

रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार

0
34

रत्नागिरी, दि. ८ – झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील खानू मठ येथे आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण पार्ले मुंबई येथील आहेत.
पार्ले येथे राहणारे प्रशांत गुरव यांची बहीण सावंतवाडी येथे राहत असून, तिच्याकडे जाण्यासाठी रात्री १ वाजण्याचा सुमारास प्रशांत आपल्या सात मित्रांसोबत निघाला. हे सर्वजण झायलो (एमएच-०६ / एएस-६२९१) कारमधून मुंबईहून निघाले. सकाळी ७.३० च्या सुमारास खानू मठ येथे त्यांची भरधाव वेगातील गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली.
या अपघातात मयूर वेळणेकर, प्रशांत गुरव, सचिन सावंत, अक्षय केरकर, निहाल कोटीयन, वैभव मनवे, केदार तोडणकर हे जागीच ठार झाले, तर अभिषेक कांबळी यामध्ये जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी प्रथम पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.