25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home महाराष्ट्र सेवा हक्क आयुक्तपदाची क्षत्रिय यांनी घेतली शपथ

सेवा हक्क आयुक्तपदाची क्षत्रिय यांनी घेतली शपथ

0
32

मुंबई दि. 2 : पहिल्या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी शपथ घेतली. राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम. एल. टहलियानी यांनी क्षत्रिय यांना शपथ दिली.मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी नेमणुकीची अधिसूचना आणि राज्यपालांनी लोकायुक्तांना प्राधिकृत केलेल्या पत्राचे वाचन केले. आयुक्तपदाचा कालावधी ५ वर्षांचा असणार आहे. शपथविधी सोहळ््यास राज्य मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांच्यासह, राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.